ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

मुंबईत मंत्रालयाबाहेर वंचितचे आंदोलन:NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


NEET परीक्षांमधील पेपरफुटी व गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याच्या निषेधार्थ आज मंत्रालयाबाहेर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडी आणि ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर “विद्यार्थी आक्रोश मोर्चा” काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या ‘NTA’ संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो,” अशा घोषणा देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाचा परिसर वेढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्याने दोन मोठ्या मागण्या लावून धरल्या आहेत. 1 ) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा: परीक्षांमधील सातत्यपूर्ण गैरव्यवहार आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. 2 ) ‘NTA’ संस्था बरखास्त करा: विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी ‘NTA’ (National Testing Agency) ही संस्था तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच, ‘NTA’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची संपूर्ण जबाबदारी ‘UPSC’ (Union Public Service Commission) कडे सोपवण्यात यावी, जेणेकरून परीक्षांमध्ये पारदर्शकता राहील. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड मंत्रालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची पळापळ झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका दिवसात 94% परदेशी कर्ज फेडण्याची ताकद:पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान, मोदींच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचे आकडेवारीसह केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवून विक्रमी टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते डिजिटल व्यवहारांपर्यंत विविध क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी सादर करत देशाची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जागतिक स्तरावर अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना भारताचा विकासदर सात टक्क्यांहून अधिक आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर