ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मार्डा डॅम हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

28 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात आढळून आलेल्या ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत मारेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना अटक केली होती.

त्यानंतरही या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय कायम ठेवत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आणखी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत उर्फ परशु उर्फ ठमकेश्वर पंढरी घागी (वय २०, रा. पावणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) आणि कार्तिक सुनिल निकोडे (वय १९, रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन संबंधित गुन्ह्यात अटक केली आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यानुसार सुरू असलेल्या शोधमोहीमेला यश मिळाले असून आता या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, शंकर बारेकर, पोलीस शिपाई सागर दीपेवार, संभा लेणगुरे तसेच मारेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर