ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

विजांच्या कडकडाटासह 22.1 मिमी पावसामुळे पेरण्यांना वेग:नेर तालुक्यातील मोझर येथे नाल्याच्या पाण्यामुळे पूरसदृश परिस्थिती‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, शुक्रवारी रात्री, शनिवारी दुपारनंतर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या मुळे जिल्ह्यात २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, खरिपाच्या पेरण्यांना वेग आला . काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले असून, तर नेर तालुक्यातील मोझर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राळेगाव, आर्णी, कळंब, नेर, यवतमाळ, दारव्हा तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. नेर तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मोझर गावालगतचा नाला दुथडी भरून वाहू लागला. परिणामी गावातील काही भागात पाणी शिरून पूरसदृश स्थिती निर्माण झाली. जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. अनेक ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर लागवडीला वेग आला. शहरासह परिसरातही जोरदार सरी कोसळल्या. काही भागात यापूर्वी पेरलेली पिके उगवणीच्या अवस्थेत असून, या पावसामुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला . त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे. विजेमुळे बैलाचा मृत्यू पांढरकवडा तालुक्यातील भाडऊमरी शिवारात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी शेतकरी जयराम वसंता किनाके यांच्या शेतात वीज कोसळून बांधलेला बैल जागीच दगावला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, घटनेच्या पंचनाम्याची मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर