ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

Saudi Prince : सौदीच्या राजकुमाराचा लंडनमधील आलिशान हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, जगातील सर्वात चर्चेतील ‘मर…

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Saudi Prince Abdullah bin Fahad Death Case : जगातील अशा काही घटना असतात, ज्या जगासमोर क्वचितच येतात. यातील एक घटना म्हणजे सौदीच्या 29 वर्षीय राजकुमाराचा लंडनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेला मृत्यू. अब्दुल्ला बिन फहाद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सौद या राजकुमाराचा मागील वर्षी लंडनमध्ये मृत्यू झाला होता. त्यावर आता मोठा खुलासा झाला आहे. या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पहायला मिळतोय.
हॉटेलमध्ये मद्य पार्टी अन्…
गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी केन्सिंग्टन येथील मॅरियट हॉटेलमधील त्याच्या खोलीत राजकुमाराचा मृत अवस्थेत आढळले. अशातच या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पहायला मिळतोय. आलिशान हॉटेलमध्ये मद्य पार्टी आणि औषधांच्या प्राणघातक मिश्रणामुळे त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती यूकेच्या कोरोनरच्या चौकशीत समोर आली आहे. मॅरियट हॉटेलमधील एका आलिशान खोलीत मृत आढळलेल्या सौदी राजकुमार अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुला बिन जलावी अल सौद यांचा एक फोटो प्रथमच समोर आला आहे.

Pictured: Saudi prince found dead in luxury London hotel room with cocktail of party drugs in his system after detoxing at the Priory https://t.co/iFBzuOgc5J
— Daily Mail (@DailyMail) July 24, 2026

सफाई कर्मचाऱ्याला सापडली बॉडी
राजकुमारची बॉडी हॉटेलच्या एका सफाई कर्मचाऱ्याला त्याच्या पाचव्या मजल्यावरील कुलूप लावलेल्या खोलीच्या स्नानगृहात आढळला. राजकुमार सापडला तेव्हा त्याने पूर्ण कपडे घातले होते. डेली मेलच्या वृत्तानुसार , हॉटेलमधील खोल्यांचं भाडं प्रति रात्र सुमारे 600 युरो होते. गॅमा-हायड्रॉक्सीब्युटिरेट (GHB) नावाचे पार्टी ड्रग आणि इतर अनेक पदार्थांचे सेवन केल्यामुळे राजकुमाराला हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून समोर आली होती.
पोस्ट मॉर्टम करणाऱ्या डॉक्टरने काय सांगितलं?
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार , एका पोस्ट मॉर्टम करणाऱ्या सहकारी डॉक्टरने त्याचा मृत्यू अपघात असल्याचं घोषित केलं असून, आत्मघात किंवा आत्महत्येचा कोणताही पुरावा आढळला नाही. तरी देखील आता या प्रकरणाचं गुढं आणखीच वाढत असल्याचं पहायला मिळतंय. उपचारादरम्यान राजकुमाराने चांगला प्रतिसाद दिला होता आणि विषबाधा उतरवण्याती प्रक्रिया कोणत्याही शारीरिक दुष्परिणामांशिवाय पार पडली होती. पण अखेर त्यांना जीव गेला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर