ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतकऱ्यांना पिक कर्जाची प्रतिक्षा.

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी तालुक्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मार्चपूर्वी पहिला टप्पा कर्जाचा वाटप केला व दुसरा टप्पा अजून पर्यंत वाटप न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला असून पीक कर्ज लवकर मिळण्यात यावे याकरिता तंटामुक्त अध्यक्ष शरद काळे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार मेघना कावली यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

अडेगाव ग्राम विविध सोसायटी कार्यकारी सहकारी संस्था अडेगाव ६३० तालुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ येथील नेहमी कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वंचित केले आहे.शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे उधार घेऊन घरातील पिके विकून बँकेमध्ये भरणा केली परंतु अजूनही त्या शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुकुटबन यांनी कर्ज पुरवठा केला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैसा राहणार नाही बँकेच्या आशेवर शेतकरी वर्ग होता परंतु बँकेने सुद्धा निराशा केली आहे.त्यामुळे त्यामुळे शेतकरी वर्गावर आत्महत्येची वेळ आलेली आहे.असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

अडेगाव सोसायटीचे अध्यक्ष संचालक सचिव हे शेतकऱ्यांकडे लक्ष देताना दिसून येत नाही तेव्हा आम्हास कर्जपुरवठा लवकर मिळवून देण्यात यावा असी निवेदनातून मागणी केली आहे. यावेळेस कृष्णदेव काळे, सुनील पाचभाई, सिंधुबाई पिंपलशेंडे, तुळशीराम उईके, सिंधुबाई हेपट ,गणेश पारखी मार्कंडी पारखी, सीताबाई गौरकार, कविता सूर, संदीप पाचभाई ,नेताजी पारखी ,महेश ठेगणे ,अरुण हिवरकर ,भास्कर सूर ,

ज्योती ठेंगणे ,संजय पावडे, अनोज चामाटे, सखाराम हिवरकर ,केशव पिंपळशेंडे, नामदेव लोंढे, महादेव चिने, नामदेव ठेंगणे, आनंदराव ढुमणे, नवनाथ क्षीरसागर ,भारत उरकुडे, विनोद धुमणे, कल्पना उरकुडे ,मारोती सिरसागर, रवींद्र लोंढे, सुरेश खोबरे, चंदू धोटे ,गिरीधर पिंपळकर,दीपक पिंपळकर,नामदेव पारखी प्रभाकर सूर, इ. शेतकरी उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर