नसरापूर प्रकरणात सरकार ॲक्शन मोडमध्ये:37 सराईत आरोपी पोलिसांच्या रडारवर, विशेष कोर्टाची प्रक्रिया सुरू; आरोपींना देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना आता प्रशासनाने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या…

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना,…

हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा लिलाव बंद पाडला या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण…

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील – निकम

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची…

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल…

अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी ‘अघोरी पूजे’वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे…

सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी:मुख्य सूत्रधार पत्नीसह चार अटकेत, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या लोभापोटी एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता; भाजप नेत्यांचीही भेट घेण्याचा अंदाज

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. त्या तिथे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्या…

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला

पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी…

उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल:शिंदेंनी खासदार संजय पाटलांची भेट घेताच, ‘मातोश्री’नेही आपले विश्वासू पाठवले

मुंबईतील एका राजकीय भेटीने राज्याच्या राजकीय वर्तुळात एक नवा चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची रुग्णालयात जाऊन…

error: Content is protected !!