ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

प्रेरणा उपक्रमा अंतर्गत शाळा स्तरावर  तालुक्यातिल विद्यार्थांना प्रोत्साहनपर पारितोषिकांचे वितरण.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की..
  झरी जामणी तालुक्यात जिल्हा परिषद यवतमाळ आणि शिक्षणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हामध्ये सुरू असलेल्या प्रेरणा या उपक्रमांतर्गत सराव साहित्याचा उत्कृष्ट सराव करणार्‍या विद्यार्थांना शाळा स्तरावर पारितोषिकांचे वितरण करण्यात येत आहे.

या अनुषंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पाटण येथे  प्रकाश नगराळे गटशिक्षणधिकारी  यांनी आज रोजी शाळेस भेट दिली.या भेटी दरम्यान त्यांनी इयता 4 थी ते 7 वी च्या विद्यार्थांनी प्रेरणा उपक्रमांतर्गत मिळालेल्या साहित्याचा सराव कसा केला आहे,याबाबतचे मूल्यांकन केले.या मूल्यांकंतर्गत ज्या विद्यार्थांनी सराव साहित्याचा दिलेल्या सूचनासहित सराव केला आहे,अशा विद्यार्थांना पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रभाकर चुक्कलवार (मुख्याध्यापक),गंगाधर पडलवार,महेश किनाके,अमोल चुकलवार,सुजाता बंडेवार, राजश्री मरापे उपस्थित होते.
यामध्ये शिक्षणा फाऊंडेशनचे विवेक कामडी यांनी विद्यार्थांचे सराव साहीत्याचे मापन तंत्र गटशिक्षणधिकारी यांना विशद केले.
प्रेरणा उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद उच्च  प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 4 थी ते 8 वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान  आणि मराठी या विषयांच्या सराव पुस्तिका उपलब्ध करून दिल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 78 हजार विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग झाला आहे.

परितोषित वितरण प्रसंगी बोलत असताना मा. गटशिक्षणधिकारी यांनी या उपक्रमा बाबत युनायटेड वे हैदराबाद यांच्या सौजन्या बद्दल त्यांचे आभार मानले आणि शिक्षणा फाऊंडेशनला अशा नावीन्य पूर्ण उपक्रमांसाठी भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर