ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झुणका भाकर केंद्रावर जेवण करतांनाच आला ह्रदयविकाराचा झटका.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव शहरात घडली भर दुपारी घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोज सोमवारला दुपारच्या सुमारास मारेगाव शहरात सगळीकडे लोकांची वर्दळ सुरु असते अनेकजण आपल्या कामात गर्क होते.अशातच एक व्यक्ती दुपारी मारेगावच्या मेन चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये जेवण करायला येतो. जेवण करायला लागतो आणि दोन तीन घास होताच लगेच त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. तो खाली कोसळतो. त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना मनाला धक्का देणारी आहे.

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील 58 वर्षीय भास्कर दौलत वेले हे मारेगाव येथे काही कामानिमित्त आले होते. दुपारी आपले काम आटोपून ते मारेगाव शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये झुणका भाकर खात होते. दोन चार घास खात नाही तोच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषित केले.

अविवाहित असलेले भास्कर वेले हे वेगाव येथील माजी उपसरपंच होते.मोजके बोलणारे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व अचानक अशा पद्धतीने जीवनातून एक्झिट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर