ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अखेर करणवाडी ते शिबला रस्त्यासाठी अफजल खान यांचे तहसिल समोर आमरण उपोषण.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- करणवाडी ते शिबला रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणर कामाला त्वरीत सुरूवात करण्यासाठीआज दिनांक 5 मे 2022 रोज गुरुवार पासून अफजल खान युसुफ खान पठाण यांनी मारेगांव येथील तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

करणवाडी, नवरगांव,सगणापुर, म्हेसदोडका, रोहपट, व झरी तालुक्यातील शिबला, येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे.त्या मुळे अनेक छोठे मोठे अपघात झाले आहे. आणि त्या मार्गाने ये- जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना मनक्याचे आजारात कमालीची वाढ झाल्याची माहिती  प्राप्त झाली आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण होवून सुद्धा यावर प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.



व त्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. हे वास्तव्य आहे  रस्त्यांनी वाहने तर सोडा पण पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्याच प्रमाणे नवरगाव पासून जवळच असलेल्या पुलावरील मोठ मोठे खड्डे पडले असुन पुलाच्या बांधकामाच्या सळाखी बाहेर निघाल्या आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिल्याची माहिती आहे. पण त्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. अखेर ग्रामस्थांनी निवेदने देऊनही प्रशासना कडून दखल घेण्यात आली नाही.

त्या मुळे आज दिनांक 5 मे पासुन मारेगांव येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे.रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसा पासुन लढा देत आहे.

अफजल पठाण यांनी गेल्या 8 एप्रिल रोजी या रस्त्याच्या मागणीसाठी महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागासह आदींना निवेदन पाठवण्यात आले होते.तसेच रस्त्याचे काम चालू न केल्यास 5 मे पासून आपण आमरण उपोषण करू असा इशाराही निवेदनाद्वारे अफजल पठाण यांनी दिला होता.मात्र प्रशासनाने निवेदनाची कुठलीच दखल न घेतल्याने 5 मे पासुन येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहे.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मारोती गौरकर, जि.प.सदस्य अनिल देरकर, माजी सरपंच अरुण नक्षणे, संदीप आस्वले सह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणास आपला पाठींबा दर्शविला….



 

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर