Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

नवरगाव मध्यम प्रकल्प ओवर फ्लो.

येथिल पुलावरून पाणी, तेरा गावचा संपर्क तुटला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प पुर्ण भरल्याने ओसंडून वाहत आहे .परिसरातील व बाहेर जिल्ह्यातील नागरिकांनी नयनरम्य  दृश्य  नागरिकांना आकर्षित करीत असल्याने येथे वर्दळ वाढली आहे .नवरगाव धरण हे  मारेगांव वरुण सुमारे 8 कि.मी.अंतरावर आहे.तसेच तलाव फुल झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे तेरा गावचा संपर्क तुटलेला आहे.

ता.15 ला पहाटे हा नवरगाव मध्यम प्रकल्प पुर्ण भरल्याने ओसंडून वाहत आहे.ओवरफ्लो झाल्यामुळे यष्टीअर वरुण मोठ्या प्रमाणात पाणी फेकले जात आहे.पुलावरून पाणी असल्यामुळे या परिसरातील तेरा गावचा संपर्क तुटला आहे

मारेगाव तालुक्यात गेल्या तेरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे.नवरगाव मध्यम प्रकल्प  पाण्याने पुर्ण भरले असुन पाणी ओसंडून वाहत आहे.आज ता.15 जुलै 2022 ला शुक्रवारला पहाटेच्या सुमारास नवरगाव मध्यम प्रकल्पच्या अतिरिक्त सांडव्यावरून पाणी ओसंडूनवाहत आहे.तेरा गावचा संपर्क येत असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटलेला आहे.

मारेगाव तालुक्यासह बाहेरच्या तालुक्यातून व जिल्ह्यातील नागरीक नयनरम्य दृश्य बघण्याकरिता  नवरगाव मध्यम प्रकल्पाकडेधाव घेत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणीही पुलावरून जावू नये.कारण पुलावरून पाणी वाहत असताना दोन वर्षा आधी एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोणीही पुलावरून पाणी असताना पूल ओलांडून नये, असे आवाहन केले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!