Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

संपूर्ण झरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा .

शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगूल यांची मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तालुक्यामध्ये दिनांक ०५ जुलै २०२२ रोजी पासून संतधार पाऊस सुरु असल्यामुळे नकतेच उगवण झालेल्या शेत पिकांची अपरमित हानी झालेली आहे. तसेच दिनांक ११ जुलै२०२२ व दि. १२जुलै२०२२ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे झरी जामणी तालुक्यातील संपुर्ण गावामध्ये पाणी घरामध्ये घुसून शेतीचे व घरांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पैनगंगा नदिला आलेल्या पुरामुळे त्या नदिच्या काठावरील गावांना धोका निर्माण झालेला आहे.

तरी प्रशासनाला तात्काळ गांव सर्व्हे व शेताचे सर्व्हे करून तातडीची आर्थिक मदत दयावी व झरीजामणी तालुक्यातील संपूर्ण महसुली मंडळात ओला दुष्काळाचे सावट पसरले असुन झरी जामणी तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहिर करून मदत देण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी झरी यांचे यांनी तहशीलदार झरी जामणी यांचे मार्फत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे कडे करण्यात आली आहे.

निवेदन देताना चंद्रकांत घुगूत शिवसेना तालुकाप्रमुख निलेश बेलेकार युवासेना प्रमुख , कवडू कोयरे , बाळा धोबे , विश्वजित जुमनाके इ. शिवसेना पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!