Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मुकूटबन पोलीसांची  कारवाई.

दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील दरारा येथील खडका नाला पुलाजवळ वाळू  ट्रॅक्टर ट्राली व्दारे अवैद्य रित्या वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या मुकुटबन पोलीसांनी आवळल्या आहे .

दि. २२ जुलै  रोजी संध्याकाळी ५.३० वा.सुनिल बळीराम पेंदोर वय २५ वर्षे धंदा चालक व मालक रा.दरारा ता.झरी जामणी  आणि प्रदिप भीमराव कुळसंगे वय ३२ रा. सोनेगांव ता. वणी  हे दोघेही दरारा येथील खडका नाला पुलाजवळ वाळू ट्रॅक्टर महिंद्रा सरपंच ५८५ डी आय  एम एच २९ बि.पी ०२८८० व ट्रॉली एम   एच २९ ए के६२२३  किंमत अंदाजे ६ लाख- रु तसेच एक ब्रास वाळु ६,००० रु असे एकुण – सहा लाख सहा हजार रुपये तसेच

दुसरे ट्रॅक्टर  ट्रैक्टर महिंद्रा सरपंच ५८५DIS  एम.एच २९  ए के १२०७ किंमत अंदाजे – ४ लाख/-रु असा एकूण १० लाख हजार रुपये/- चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.अशा फिर्यादीचे लेख रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर ची कारवाई गजानन भांदक्कर तपासी अधिकारी दिलिप जाधव यांनी पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!