ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा औचित्य साधून विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

198 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- वणी

वणी:- शिवसेना विधानसभा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 27 जुलै 2024 शनिवारला दुपारी 12 वाजता आयोजित केले आहे.

वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय देरकर यांनी “माझी वीज,माझा अधिकार” हे अभियान संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राबविले.या अभियानाला शासनाकडून काही प्रमाणात दाद सुध्दा मिळाली. शासनाने 7 एच.पी पर्यंतच्या कृषी पंपाना वीज मोफत देण्याची घोषणा केली होती.

संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर,आता वणी-वरोरा मार्गावरील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिरा जवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनतेच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय उभारले आहे.

या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते होणार आहेत.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) असणार आहेत.

सोबतच प्रमुख अतिथी म्हणून युवासेना जिल्हाध्यक्ष अमोल धोपेकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा संघटिका डिमनताई टोंगे,माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास,मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी,वणी शहर प्रमुख सुधीर थेरे,वणी तालुका संघटिका सीमा आवारी, मारेगाव तालुका संघटिका वनिता काळे, मारेगाव शहर प्रमुख अभय चौधरी, तालुका संघटक गणपत लेडांगे,

वणी शहर संघटिका सुचिता आवारी,मारेगाव तालुका संघटक सुनील गेडाम,उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे,सहसंपर्क प्रमुख वणी विधानसभा संतोष माहुरे, संघटक सुनील कातकडे, प्र.तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, मा.तालुका प्रमुख रवी बोढेकर,जिल्हा वाहतूक संघटक विनोद उपारवार, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, झरी शहर प्रमुख संजय बीजगुणवार, झरी तालुका संघटिका सुरेखा भोयर,ज्योती बीजगुणवार नगराध्यक्ष झरी,

डॉ,मनीष मस्की नगराध्यक्ष मारेगाव, झरी तालुका संघटक सतीश आदेवार, युवासेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष्य ठाकरे, युवासेना वणी तालुका प्रमुख प्रवीण डोहे, युवासेना झरी तालुका प्रमुख निलेश बेलेकर, युवासेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे, युवासेना उपजिल्हा प्रमुखसमन्वयक समीर लेनगुळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांची उपस्थिती राहणार आहे.

आज दिनांक 27 जुलै 2024 रोज शनिवारीला दुपारी 12 वाजता वरोरा रोडवरील श्री जगन्नाथ बाबा मंदिराजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना तथा समस्त शिवसैनिक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर