मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव शासनाने बेंबळा प्रकल्पाना न्याय दिला नाही तर त्यांच्यासाठी लढा तीव्र करू असा इशारा बेंबळा प्रकल्प हक्क समितीचे प्रनेते सुधाकर इंगोले यांनी दिला. ते मारेगाव येथील तहसील कार्यालया समोर एकदिवशीय धरणे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट होते तर प्रमुख पाहुणे मारेगाव तालुका पत्रकार संघांचे प्रनेते तथा माजी प्राचार्य भास्कर धानफुले सावंगी येथील सरपंच मांडेकर बोरीं येथील सरपंच प्रवीण नान्ने, दापोरा येथील सरपंच चंद्रशेखर जवादे, देवाळा येथील उपसरपंच सुरेश लांडे, बेंबळा प्रकल्प हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष सुमित जुनगरी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गगाधर लोणसावळे, तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की,मार्डी, कुंभा परिसरातील अनेक गावातून बेंबळा तयार केलेले मुख्य कालवे, उपकालवे, व पाटसऱ्या फुटून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची शासन प्रशासन स्तरावरून पाहणी करण्यात आली असताना मात्र अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही.

त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गात संतप्त भावना पसरत आहे.त्यामुळे शासन, प्रशासनाने त्याच्या न्याय हक्का च्या मागण्या मान्य करून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही तर त्यांच्या न्यायासाठी हा लढा तीव्र करू असा इशारा उपस्थित पुरपीडित, बेंबळा प्रकल्प ग्रस्त तथा अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यां समोर मार्गदर्शन करताना केले.
सरपंच संघटना बेंबळा प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती, पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विध्यमाने मारेगाव येथील तहसील कार्यालयावर एकदिवशीय आंदोलन आयोजित करण्यात आले होते .प्रकल्प ग्रस्ताना तात्काळ मोबदला मिळावा या प्रमुख मागणी सह अतिवृष्टी, तथा पुरबुडी ग्रस्ताना,तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागनीचे निवेदन तहसीलदार दीपक पुंडे यांचे कडे देण्यात आले आहे.
हे आंदोलन मंगळवार दिनांक 4 आक्टोबर ला सकाळी 11 वाजता सुरु करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता या आंदोलनाचा सकारात्मक चर्चे नंतर समारोप करण्यात आला.या आंदोलनाला तालुका पत्रकार संघांचे भास्कर धानफुले, कोसारा येथील सरपंच पांडुरंग नन्नावरे,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, गगाधर लोणसावळे महाराज संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, मराठा सेवा संघांचे तालुका अध्यक्ष ज्योतिबा पोटे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत मत्ते, मनसेचे गजानन चंदनखेडे, चोपण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गौरकर,यांनी मार्गदर्शन केले.
यां आदोलन मंडपाला मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष नबी शेख, राष्ट्रवादीचे सचिन पचारे,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सुमित गेडाम यांनी पाठींबा दिला.सूत्रसंचालन पत्रकार संघांचे तालुका सचिव माणिक कांबळे यांनी तर आभार पत्रकार संघांचे उपाध्यक्ष भास्कर राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी मारोती तुरानकर, दिलीप खेकारे, गुरुदेव पचारे,यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
