गाडेगांव येथील शेतमजुराची कीटकनाशक प्राशन करून
आत्महत्या.

चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गाडेगांव येथील शेतमजुराने पत्नीचा बिमारी मुळे 6 एकर शेती विकली पण पत्नीचा मृत्यू झाला. पत्नी गेली व शेती गेली त्यामुळे जीवनाला कंटाळलेल्या शेतमजुराने विषारी Glycel नावाचे राऊंडप कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा काल दिनांक 24 डिसेंबर 2022 रोज शनिवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

किसन सोनबा डंबारे वय सुमारे 70 वर्षे रा.गाडेगांव असे आत्महत्या करणाऱ्या शेतमजुराचे नाव असून त्यांनी काल सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःचा घरी Glycel नावाचे राऊंडप कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी लगेच त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृर्ती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतर केले.

पण चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या नावाने 6 एकर शेती होती पण पत्नीच्या बीमारी साठी त्यांनी संपुर्ण शेती विकुन पत्नीला पैसे लावले पत्नीचा मृत्यू झाला त्या मुळे किसनराव हे मानसिक तणावात व चिंतेत असल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.किसनराव यांच्या पश्चात एक मुलगा, तिन मुली,नातवंड असा अप्तपरिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!