ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव ट्रकच्या धडकेत पायदळ जाणारा शेतकरी ठार.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ट्रक रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी.

शेतकऱ्याचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू.

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावरील घटना.

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर वणी कडून कोळसा घेऊन यवतमाळ कडे जाणाऱ्या ट्रकने पायदळ जाणाऱ्या शेतकऱ्याला जबर धडक दिली व रोडच्या दुसऱ्या दिशेला पलटी झाला.ही घटना काल दिनांक 13 जुन 2023 रोज मंगळवारला रात्री 9.30 वाजताचे सुमारास मारेगांव पासुन काही अंतरावर राज्यमहामार्गावर घडली.

सुरेश विश्वनाथ पारखी वय सुमारे 40 रा.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.ते काल रात्री 9.30 वाजताचे सुमारास मांगरुळ जवळील शेतातून काम आटोपुन मारेगाव कडे आपल्या दिशेने पायदळ घरी येत असताना भरधाव ट्रकने जबर धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले.रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी सुरेश यांना उपचाराकरिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले पण उपचारादरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.शेतकऱ्याचा चंद्रपूर रुग्णालयात मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर ट्रक हा वणी कडून कोळसा घेऊन यवतमाळ जाणारा ट्रक क्रमांक MH 34 BZ 0046 ने सुरेश पारखी यांना जबर धडक दिली व ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या कडेला जाऊन पलटी झाला.
असुन हा अपघात राज्य महामार्ग असलेल्या मारेगाव व मांगरुळ जवळील एका पेट्रोल पंपाजवळ झाला.

मृत सुरेश यांचे पश्चात आई,वडील,पत्नी व एक मुलगा असुन त्याचे असे अवेळी जग सोडून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर