ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव आज पासून होणार सुरु.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सकाळी 11 वाजता सुरु होणार भव्य गोटमार.

गजनान देवाळकर मारेगाव:- तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील आज दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात होत आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री गदाजी महाराज यांचे मंदिर आहे.

धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात आले आहे.आज मंदिराच्या परिसरात सकाळी कबड्डी खेड्ल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची (मढ) मिरवणुक संपूर्ण गावासभोवती वाज्या गाज्यात काढल्या जाते व त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते.त्या नंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात.

मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात.तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरीऱ्या कडून प्राप्त होते.

आज पासुन सुरु होणारी यात्रा हि तिन दिवस असुन या यात्रेचे आयोजन पुढीप्रमाणे करण्यात आले आहे.आज दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवारला सकाळी 8 होळकर खेळ (मढ) रंगपंचमी मिरवणुक व त्या नंतर सकाळी 11 वाजता भव्य गोटमार व दुपारी 2 वाजता दहीहंडी आणी गोपाल काला दुपारी 4 वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आहे.

आणी दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन आज पासुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर