सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही नावलौकिक.
ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) तालुक्यातील पाटण येथिल रहिवासी डॉ.दिलिप अलोने यांना पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय जादू परिषदेत जादू भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी पुणे येथील सदाशिव पेठ येथे उद्यान प्रसाद नाट्यगृहात राष्ट्रीय जादू परिषदेचे सातवे संमेलन संपन्न होत आहे.
या संमेलनात भारतातील 200 जादूगार सहभागी होत आहेत.डॉ.दिलीप अलोने हे 1972 पासून जादूचे प्रयोग करीत असून आपल्या अनेकविध चित्त थरारक प्रयोग आणि त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.डोळ्यावर पट्टी बांधून शहरात मोटरसायकलने भ्रमण करण्याचा त्यांचा प्रयोग रोमांचकारी आहे.
नव्या पिढीमध्ये या कलेचे आकर्षण निर्माण व्हावे व या कलेचे संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी जादू प्रशिक्षण शिबिरही घेतली आहेत.या संमेलनातही ते त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत आयोजक डॉक्टर भाऊसाहेब झोडगे मायावी डॉक्टर बालाजी कोरे दिलीप कोंडे या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत .
