Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

झरी तालुका पत्रकार संघटनेकडून महाराष्ट्रदिनी पाटण येथे भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन .

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील पाटण येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात झरी तालुका पत्रकार संघटनेकडून १ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा चौदा वर्षा वरील वयोगटातील सर्वासाठी खुली स्पर्धा आहे.

मागील वर्षा पासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून मागील वर्षीचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या नृत्य स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तालुक्यात अनेक जणांकडे कला,सुप्त गुण आहे मात्र व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांना आपली कला दाखविता येत नाही.म्हणून पत्रकार संघटनेने या नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सहा हजार रु,दुसरे पाच हजार रु,तिसरे चार हजार रु,चौथे तीन हजार रु,पाचवे दोन हजार रु, सहावे एक हजार रु तसेच मानचिन्ह व प्रमाणपत्र विजेत्यांना देण्यात येईल.तसेच यावेळी तालुक्यातील राजकीय,सामाजिक,

शैक्षणिक,कला व खेळ यामध्ये विशेष कामगीरी व तालुक्याला नावलौकिक मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.स्पर्धेत अनेकांनी सहभागी होऊन आपली कला प्रदर्शित करावी व प्रेक्षकांनी ही या नृत्याचा आनंद घेण्याचे आवाहन पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!