मारेगांव पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ तंत्रज्ञ चंपत टेकाम यांचा सत्कार.

अहोरात्र वीज दुरस्तीचे काम करणाऱ्या कर्माऱ्याचा पहिल्यांदाच मारेगांवात सत्कार.

सुरेश पाचभाई, मारेगांव

मारेगांव येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेले चंपत अंबादासजी टेकाम यांनी मारेगाव उपविभागीय कार्यालयाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील रा.मोहदा ता.केळापुर येथे 19 जुन 1984 मध्ये जन्मलेल्या आणि अत्यंत हलाखीच्या परस्थितीतुन जिल्हा परीषद शाळेचे 1 ते 10 वि पर्यंत चे शिक्षण मोहदा येथे घेतले.त्या नंतर 11वी ते 12 विचे शिक्षण यवतमाळ येथे केले.त्यांनी ITI चे शिक्षण अंतरगांव येथुन पूर्ण केले.काही दिवसा नंतर सन 2013 मध्ये महागांव येथील उपविभाग कार्यालयात त्यांची प्रथम नेमणूक झाली.

त्यानंतर सन 2016 मध्ये मारेगांव तालुक्यातील 33 केव्ही सबस्टेशन मार्डी येथे त्यांची नेमणूक झाली.त्या नंतर त्यांची बदली मारेगांव अर्बन (शहर) विभागात झाली त्यांना 6 गावचा पदभार देण्यात आला.त्या मध्ये कान्हाळगांव,करणवाडी, नरसाळा, खडकी,घोडदरा,शिवणाळा या गावांच्या समावेश आहे.

त्यांनी विज वसुली मध्ये 100% उदिष्ठ प्राप्त केले.अहोरात्र वीज जोडणी व दुरस्ती तसेच वीज गेल्यास गावातील व्यक्तीचा फोन येताच जेव्हा बोलावले तेव्हा हजर राहून सेवा देणे व दिवस किंवा रात्र न बघता जनतेच्या सेवेसाठी परिवाराची पर्वा न करता काम करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ चंपत टेकाम यांचा सत्कार.मारेगांव पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी,या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्र आनंदराव कुर्लेवार सहाय्यक अभियंता मारेगांव(शहर) आशिष पवार कनिष्ठ अभियंता (ग्रामीण) पुरोगामी पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक भास्करराव धनफुले (सर) ,मोरेश्वर ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष, भास्कर राऊत,तालुका अध्यक्ष, गजानन देवाळकर तालुका सचिव, धनराज खंडरे,उपाध्यक्ष, सुरेश नाखले,सुमित गेडाम,भैय्याजी कनाके,सुमित हेपट माजी अध्यक्ष,सुरेश पाचभाई,गजानन आसुटकर,आनंद नक्षणे,शरद खापने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!