ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

लोखंडी कंपाउंडचे पोल चोरटे गजाआळ.

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

30,000 रु. चा मुददेमाल हस्तगत.

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपांना संरक्षण करण्याकरिता आणलेल्या पोलांमधून 50 लोखंडी पोल चोरी गेले होते. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली होती.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आज दि.20 जुलैला दोन संशायित आरोपीना अटक केली असून आणखी काही मोहरे पोलिसांच्या रडारवर आहे.

तालुक्यातील भालेवाडी रोपवन वाटीकेच्या लोखंडी पोल आणि तारेचे संरक्षणाचे काम पांढरकवडा येथील ठेकेदार रोहित लक्ष्मण बोलेनवार यांना टेंडरद्वारे मिळाले होते.त्यासाठी त्यांनी 10 जुलैला 900 लोंखडी (ms )अँगलचे पोल आणले.आणि मजुरांकरवी गाडले. सदर गाडलेल्या पोलची पाहणी करने करिता ठेकेदार आणि त्यांचे मजूर हे दि.19 जुलैला रात्रीचे सुमारास गेले असता त्यांना त्यातील गाडून ठेवलेले 50 लोखंडी पोल (किंमत अंदाजे 30 हजार रुपये) आढळून आले नाही.

सदर चोरी गेलेले पोल त्यांनी सगळीकडे शोधले असता मिळून न आल्याने अखेर ठेकेदाराने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.सदर गुन्हयातील फरार संशायित आरोपी व मुददेमाल शोधकरीता तात्काळ पो.स्टे.चे पथक तयार करुन नमुद गुन्हयातील संशायित आरोपी 1) हुसेन सदानंद आडे वय 24 वर्ष रा. बोदाड ता. मारेगाव 2) शाम महादेव गाताडे वय 29 वर्ष रा. सालेभटटी ता. मारेगांव यांना पाथरी शिवारातुन मुददेमालासह ताब्यात घेण्यात आले.

सदर संशायित आरोपीनी गुन्हा कबुल केला असून त्यांचेकडून एम.एस.अँगल पोल 50 अंदाजे 30,000 रु.हस्तगत करण्यात आला आहे.सदर गुन्हयात पुन्हा कोणाचा सहभाग आहे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.सदर संशायित आरोपीवर कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल केला

असुन सदर गुन्हयाचा तपास मा.डॉ.पवन बन्सोड पोलीस अधिक्षक यवतमाळ,पुयुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ,गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पो.नि.आधारसिंग सोनवणे स्थागुशा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.जर्नाधन खंडेराव ठाणेदार मारेगांव, पोहेकॉ.आनंद अलचेवार,नापोकॉ.अजय वाभीटकर नापोकॉ. रजनीकांत पाटील,नपोकॉ अफजल पठाण,नपोकॉ राजू टेकाम,चासफो प्रमोद जिडडेवार,पोकॉ.विकास खंडारे व चापोकॉ.अतुल सरोदे हे करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर