Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

वेगवेगळ्या अपघातात दोन महिला गंभीर.

गुरुवार ठरला घातवार.

राज्य महामार्गावरील खड्डे सबंधित विभागाला दिसेना.



मारेगाव तालुका प्रतिनिधी:- गजानन आसुटकर,

मारेगाव तालुक्यातील गौराळा बसस्टॉप पासून काही अंतरावर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे.आज दोन दुचाकीस्वार पत्नीसह त्यांच्या दुचाकीने वणी कडून मारेगावकडे येत असताना हे दोन अपघात झाले हे अपघात खड्ड्या मुळे झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रस्त्यातील खड्डया मुळे दुचाकी वरील नियंत्रण सुटून पडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या तर पुरुष किरकोळ जखमी झाल्याची हि घटना आज दिनांक 24 ऑगस्ट 2023 गुरुवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली.

सुनिता नागेश खंडाळे वय सुमारे 30 वर्ष रा वरोरा जि.चंद्रपूर व त्याचे पती हे वरोरा येथून आपल्या माहेरी पती सह वेगाव ता.मारेगाव येथे येत असताना गौराळा बस स्टॉप पासून काही अंतरावर हा अपघात झाला तर लता विलास देउळकर वय सुमारे 50 वर्ष रा गोंडबुरांडा व त्यांचे पती आज काही कामानिमित्त वणी येथे गेले होते येथील काम आटोपून मारेगाव कडे येत असतांना गौराळाच्या हद्दीत राज्य महामार्गावर अवघ्या अर्धा कीमी अंतरावर एकापाठोपाठ असलेल्या खड्या मुळे हे दोन्ही अपघात झाले हे विशेष असुन सबंधित विभागाने लक्ष केंद्रीत करून रस्त्यातील खड्याची लवकरात लवकर दुरस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी लगेच मारेगाव पोलीसांना सदर घटनेची माहिती दिली व जखमींना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!