सुदैवाने पती सह सोबतचा एक व्यक्ती बचावले.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,
शेतातील कामे आटोपून घरी परतत असतांना बैलबंडीवर वीज कोसळल्याने एक महिला ठार झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात घडली.यात सुदैवाने पती आणि सोबतचा एक व्यक्ती बचावले असून बैलाला मात्र किरकोळ इजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सुवर्णा संजय कांबळे वय सुमारे 32 वर्ष ही आपल्या पती आणि एका शेतमजूर व्यक्तीसोबत नेहमी प्रमाणे शेतामध्ये गेले होते.शेतातील कामे आटोपून आपल्या पती आणि शेतमजूर व्यक्तीसोबत बैलबंडीने घरी परतत येत असताना अचानक गोरज फाट्याजवळ यांच्या बैलबंडीवर अचानक वीज कोसळली.
यात महिला हि जागेवरच मृत्यूमुखी पडली तर पती आणि सोबत असलेला शेतमजूर जागेवरच बेशुद्ध पडले होते.आणि बैलही खाली पडलेले होते.ही घटना आज दिनांक 4 सप्टेंबरला रोज सोमवारला दुपारी 2 च्या सुमारास घडली असुन
तालुक्यात सुमारे 1 महिन्याच्या दिर्घ विश्रांती नंतर परिसरात पावसाने काल पासून पावसाने अचानक एन्ट्री केली.या पावसासोबत विजेचा सुद्धा कडकडाट सुरु आहे.सततच्या वीज पडण्यामुळे मजुरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.महिलेच्या पश्चात पती, दोन मुली,एक मुलगा असा आप्त परिवार पाठीमागे आहे.
