विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील शिवनाळा (तेलाई पोड) येथील एका 50 वर्षीय शेतमजुराने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
साविस्तर वृत्त असे की..
केशव हनगु रामपुरे वय सुमारे 50 वर्ष रा.शिवनाळा (तेलाई पोड) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून केशव हा अतिक्रमित जागेवर शेती करत होता व त्यावर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा
त्यांनी दहा दिवसा आधी स्वताच्या राहते घरी विषारी कीटक नाशक प्राशन केले होते.कुटुंबातील सदस्यांना सदर घटना लक्षात येताच त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.
चंद्रपूर येथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्या मुळे त्यांना शिवनाळा (तेलाई पोड) येथे त्यांच्या गावी आणण्यात आले होते.मात्र दोन दिवसा आधी अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्या मुळे त्यांना यवतमाळ येथे हलविले आहे होते.
यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असुन मृतक शेतकरी केशव यांच्या पश्चात आई,पत्नी व दोन मुले आहे.या घटनेने शिवनाळा गावात शोकाकुळ पसरली आहे. बातमी लीहे पर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण कडु शकले नाही.
