ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला झाली सुरुवात.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सत्ताधारी विरोधी व अपक्षात होणार चुरस.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

करंजी रोड महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका येत्या 18 सप्टेंबर रोजी होऊ घातल्या त्यानुसार केळापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणुकीला 18 सप्टेंबर मतदान होणार आहे केळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत करंजी रोड असून राजकीय क्षेत्राचे केंद्रबिंदू मानल्या जात आहे.

त्यानुसार होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या वतीने पूर्ण पॅनल लढविण्यात येत आहे.सोबतच सरपंच पदाचे सार्वत्रिक जनतेतून निवडणूक असून यामध्ये चार उमेदवारांचा समावेश असून त्यामध्ये दोन राजकीय गटाचे उमेदवार तर दोन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे तसेच सदस्य पदाकरिता एक अपक्ष महिला व दोन्ही राजकीय गटामध्ये 22 उमेदवार सदस्य पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या सर्व उमेदवारांचे भविष्य ठरविणारे मतदार अतिशय बारकाईने विचार करून सामाजिक राजकीय उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घेत आहे.

अशी चर्चा करंजी येथील मतदार करीत आहे ही निवडणूक दोन्ही राजकीय गटांना अतिशय प्रतिष्ठेची असून प्रतिष्ठापनाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन उमेदवारया सोबत पुढारी सुद्धा पाय धरून मत मागण्याचा जोगवा हाती घेतलेला दिसत आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबरला कोणत्या उमेदवाराला मतदार निवडतील हे येणारी परिस्थिती ठरवेल सर्वसामान्य मतदार स्वच्छ प्रतिमा निस्वार्थ विकासात्मक धोरण असलेल्या उमेदवाराची चाचपणी मतदाराकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

उमेदवार भ्रष्टाचारी नसावा हे देखील प्रामुख्याने मतदार उमेदवाराची तपासणी करीत आहे कोणत्याही राजकीय पुढार्‍यांकडे पाहून उमेदवाराला पुढाऱ्याच्या नावाने मतदान करायचे नाही अशी सर्वत्र चर्चा मतदारात सुरू आहे दोन्ही राजकीय गटांनी निवडणुकीचे दंड थोपटून उमेदवार निवडून आणण्याकरिता दिवस रात्र एक करणे सुरू झाल्याचे चित्र गावांमध्ये पाहायला मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर