ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्की बु.जि.प.शाळेत ७ वर्ग,९५ विद्यार्थ्यांना एकच शिक्षक

148 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

त्याच्याकडे अशैक्षणिक कामे केंद्र प्रमुखाचा प्रभार,चार शिक्षक द्या,गावकऱ्यांची मागणी

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

शाळा सुरु होवून तीन आठवडे झाले आहेत पण झरी तालुक्यातील शाळा व  शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झाले नाही.अजूनही काही ९ शाळांसाठी शिक्षक नाही तर काही ठिकाणी एकच  शिक्षक असल्याने  सर्व वर्गातील एकत्र बसून शिकवण्याची कसरत करावी लागत आहे .

केंद्र शाळा म्हणून  मार्की बु. शाळा परिचित आहे.शेतकरी,शेतमजूर, बलुतेदार,अलुतेदार गरिब आदिवासी दलितांचे मुलांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने या शाळेची स्थापना १९४८ साली करण्यात आली  . त्या काळात आडकोली,मार्की खु.सालेभट्टी,अर्धवन,पांढरकवडा , गणेशपूर,शेकापूर,खापरी,मुच्छी या गावातील मुल मुली या शाळेत शिक्षणासाठी येत आताही तीनचार गावचे विद्यार्थी येत आहे.

दोनशेच्या वर विद्यार्थी त्यासाठी ७ शिक्षक असायचे  परंतु गेल्या चारपाच शिक्षकांची संख्या घसरणीवर आहे.२०२४ या सत्रासाठी ९५ विद्यार्थी आहे.या सातही वर्गासाठी एकच शिक्षक असून मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख पदाचा प्रभार आहे.ही केंद्र शाळा असून केंद्राती ९ शाळेत शिक्षक गैरहजार असल्यास डेप्युस्टेशन साठी शिक्षक नाहीत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.

पटसंख्या व केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा असल्या मुळे आणखी चार शिक्षकांची गरज आहे.शाळा व्यवस्थापन समिती,पालक व गावकरी यांनी ९ एप्रील ,७ जूलै , १५ जुलै ला शिक्षण अधिकारी जि.प .यवतमाळ यांचे शिक्षकांची मागणी केली परंतु अजूनही शिक्षक देण्यात आले नाही.लवकरात लवकर शिक्षक न दिल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती  देविदास तुरणकर सभापती शाळा व्यवस्थापन समिती यांनी दिली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर