ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दुचाकीस्वाराची संकेत फलकाला धडक; एक जण गंभीर जखमी

2.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खडकी टेकडीवरील आश्रमाजवळील घटना

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील खडकी टेकडीवरील वळण रस्त्यावर  आश्रमाजवळ दुचाकीचे नियंत्रण सुटून संकेत फलकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

या अपघातात श्रीकृष्ण वसंता मडावी (रा. बोदाळ–मार्डी, ता. मारेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण मडावी हे मारेगाव येथून काही कामानिमित्त हटवांजरी येथे भावाच्या भेटीसाठी दुचाकीने जात होते. मारेगावपासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी टेकडीवरील वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा (क्रमांक MH-32 T 6392) ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या संकेत फलकाला धडकली.

या धडकेत मडावी यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी साई मित्र परिवाराच्या रुग्णवायकेस पाचरण केले व तत्काळ मदत करत जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती आहे.सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर