ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जागतिक महिला दिनानिमित्त्य विविध स्पर्धा.

232 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथे मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम.

सुरेश पाचभाई मारेगाव- “मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप” तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिना निमित्य मारेगावात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ ला शनीवार व रवीवार रोजी महिलांसाठी भरगच्च विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकेकाळी मारेगाव येथे बरीच सांस्कृतिक चळवळ चालायची.कालांतराने येथील जुने मित्र,मैत्रिणी हे कुटुंब,व्यवसाय,कामानिमित्त बाहेरगावी गेले.पुन्हा एकदा याच मारेगावाच्या सुपुत्रांनी नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ चालविण्याचा निर्धार केला आहे.

याचाच एक भाग म्हणून हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य महिला सांस्कृतिक रॅली निघणार आहे.यात महिलांचे भांगडा नु्त्य,आदिवासी नृत्य,लेझिम पथक, कराटे पथक राहणार आहे. विषेश म्हणजे मारेगावं चे खास आकर्षण असणारे हिरकणी ढोल ताशा पथक यात सामील होणार आहे.

हे पथक खास दोन महिन्यापासून अहोरात्र सराव करीत आहे हे उल्लेखीय.ही आकर्षक रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पटवारी चौक,नगर पंचायत ,संभाजी चौक,ते बसस्थानक असा मार्गक्रमण करीत जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १२ मार्च ला सायंकाळी ४ वाजता शेतकरी सुविधा केंद्र, मारेगाव येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धा होणार असून यात प्रथम पारितोषिक ११००० द्वितीय पारितोषीक ७००० तृतीय पारितोषिक ५००० राहणार आहे.त्याची प्रवेश फी रु ५०० ठेवण्यात आली आहे.

तसेच महिलांची एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात प्रथम पारितोषिक ७००० द्वितीय पारितोषीक ५००० तृतीय पारितोषिक ३००० राहणार आहे.यासाठी प्रवेश फी २०० रूपये ठेवण्यात आली आहे.
इतर विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात येनार.

नृत्य स्पर्धा करिता प्रवेशासाठी संपर्क करा सौ.प्रतिभाताई डाखरे: ९९२२६६९६४८ सौ.मालाताई बोढे: ९७६६१३०१८६ सौ.मयूरीताई जैस्वाल: ७०६६००६६८४
यांचेशी संपर्क करण्याचे व रॅली मध्ये सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप तर्फे दीपक जुनेजा, सौ.बिना दुपारे हेपट,उदय रायपुरे,खालिद पटेल,गजानन जयस्वाल,किशोर पाटील,इत्यादी तर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर