ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

धनंजय मुंडेंची अमित शहांसोबतची भेट पूर्वनियोजित:महिनाभरापूर्वी मागितला होता वेळ, कोकाटे प्रकरणाशी संबंध नाही – सुनील तटकरे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ऐन महापालिका निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटीमागचे कारण सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “ही भेट राजकीय नसून पूर्वनियोजित होती आणि केवळ एक योगायोग आहे,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या दिल्लीवारीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, “या भेटीवरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत, पण त्यात तथ्य नाही. काल संध्याकाळीच माझा आणि धनंजय मुंडे यांचा फोनवर सविस्तर संवाद झाला. मुंडे यांनी त्यांच्या एका साखर कारखान्याच्या कामासाठी आणि इतर विकासकामांसाठी अमित शाह यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. विशेष म्हणजे, ही वेळ त्यांनी तब्बल एक महिन्यापूर्वीच मागितली होती आणि ती नेमकी काल मिळाली.” कोकाटे प्रकरण आणि मुंडे-शहा भेट केवळ योगायोग आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत आलेला न्यायालयाचा निकाल आणि त्यानंतर लगेचच झालेली मुंडे-शाह भेट, याचा काहीही संबंध नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोकाटे यांच्यावरील कारवाईचा निर्णय परवा आला आणि काल मुंडेंना भेटीची वेळ मिळाली, हा केवळ एक योगायोग आहे. या भेटीचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. भेटीनंतर मुंडे यांनी मला फोन करून चर्चेचा सर्व तपशील दिला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघू नये.” भाजपचा विरोध नाही, ती रणनीती दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला विरोध असल्याच्या चर्चाही तटकरे यांनी फेटाळून लावल्या. “भाजपचा राज्यात आम्हाला घ्यायला विरोध होतोय, असे कोण म्हणाले. असे भाजपच्या कोणत्या नेतृत्तवाने म्हटले मला सांगा. तसे कुणीही म्हटले नाही. मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही भाजप आणि राष्ट्रवादी शक्तीस्थळे आहेत. दोन्ही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, तर कार्यकर्ते विरोधकांना जाऊन मिळतील आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे राजकीय विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी मांडले. ही खरी वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे म्हटले म्हणजे, राष्ट्रवादीला विरोध आहे, असा अर्थ होत नाही. राज्यात अनेक ठिकाणी सुद्धा भाजपने राष्ट्रवादीला विरोध केलेला नाही. माझी आणि प्रफुल्ल पटेल दोघांची अमित शहांशी भेट झाली. काल मुख्यमंत्र्यांसोबतही सखोल चर्चा केली. आज आणि उद्या त्यासंदर्भात आढावा घेणार आहोत. कशा पद्धतीने युती करता येईल, त्या दृष्टीकोनातून पुढील पावले उचलली जातील,” असेही असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा… हॉटेल ‘तेजयश’ प्रकाश शिंदेंचेच:बुकिंगच्या लिंकवर प्रकाश शिंदेंचाच नंबर, सुषमा अंधारेंनी दिला पुरावा; ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची कोंडी सातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. “हॉटेल तेजयश माझे नाही, मी ती जागा चालवायला दिली आहे,” असा दावा प्रकाश शिंदे यांनी केला होता. मात्र, आज भर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी गुगल मॅप आणि व्हॉट्सॲप लिंकचा ‘लाईव्ह डेमो’ दाखवत, “हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंचेच आहे आणि अजूनही तेच चालवत आहेत,” असा सणसणीत आरोप पुराव्यानिशी केला. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर