ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

बीएमसी निवडणुकीत भाजपमध्ये बंडाची पहिली ठिणगी:अंधेरीतील वॉर्ड 82 मध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध उपरे’ संघर्ष; रुबी जायसवाल यांचा अपक्ष अर्ज

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच, अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपला मोठा घरचा आहेर मिळाला आहे. वॉर्ड क्रमांक ८२ मध्ये पक्षाने जुन्या निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाविरुद्ध भाजपचे सक्रिय कार्यकर्ते दीपक जायसवाल यांनी बंड पुकारले असून, त्यांच्या पत्नी रुबी जायसवाल यांनी अपक्ष अर्ज दाखल करत, शड्डू ठोकला आहे. भाजपने अंधेरी वॉर्ड ८२ मधून काँग्रेसमधून आलेले माजी नगरसेवक जगदीश अमिन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमिन यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन या प्रभागात काम केले, त्यांना डावलून ‘बाहेरून’ आलेल्या नेत्याला तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याच संतापातून दीपक जायसवाल यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. ‘जिहाद मुक्त अंधेरी’चा आक्रमक नारा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रुबी जायसवाल आणि त्यांचे पती दीपक जायसवाल यांनी या निवडणुकीसाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या प्रचारासाठी ‘जिहाद मुक्त अंधेरी’ हा नारा दिला असून, याच मुद्द्यावर ते आता मतदारांसमोर जाणार आहेत. या प्रखर हिंदुत्वाच्या नाऱ्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक कार्याची भक्कम साथ दीपक जायसवाल, रुबी जायसवाल आणि त्यांचे सहकारी जयनारायण छोटेलाल तिवारी हे अंधेरी परिसरात केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही परिचित चेहरे आहेत. ‘वेलिफ सामाजिक संस्था’ (Velif Social Foundation) या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. भाजपच्या गणितांना बसणार फटका? अंधेरीतील या बंडाचा थेट परिणाम भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यास मतविभाजन अटळ असून, याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळू शकतो. पक्षश्रेष्ठी आता हे बंड शमवण्यात यशस्वी होतात की जायसवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर