ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव येथे संस्कार शिबिराचे आयोजन

166 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दिनांक 25 मे पासून सुरू होणार संस्कार शिबिर

सुरेश पाचभाई मारेगाव

मुलांचा बौद्धिक शारीरिक आणि अध्यात्मिक विकास व्हावा या अनुषंगाने गुरुदेव सेवा मंडळातर्फे  संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. दिनांक 25 मे पासून सुरू होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री श्री वसंतराव पुरके हे करणार असून हे शिबिर 10 दिवस राहणार आहे.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार ग्रामगीता,धर्म संस्कृती,राष्ट्रीय एकात्मतेस पोषक असा राष्ट्रभक्त तरुण घडावा या दृष्टीने जीवन शिक्षणाचे पाठ आजच्या नवयुवकांना देण्यासाठी दिनांक 25 मे 2024 पासून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, ती पवित्र आहेत, ती पवित्र राहिली पाहिजे.त्यांना गरीबी श्रीमंतीच्या वादळाची झळ,पंथ, पक्षाचा वारा आणि तिचा जळमट लागू देऊ नये. तरच इथे देवाचे राज्य येईल.

देवाचे उज्वल भविष्य त्यांच्या रुपाने साकार होईल या साने गुरुजींच्या विचारावर लक्ष केंद्रित करून आजच्या तरुणात उठण्या बसण्या बोलण्यापासून प्रत्येक कामाची शिस्त लागावी,टापटीपपणा वाढावा, सभ्यता तसेच वडीलधाऱ्यांशी वागण्यात आदर,आज्ञापालन व नम्रता. सार्वजनिक सामूहिक जीवनात सेवावृत्ती, साधन सूचिता यासाठी वेतन निर्मूलन,सद्गुण संवर्धन,उत्तम कला गुणांनी युक्त वेळेचा सदुपयोग तसेच व्यवहारात सातत्याचा, बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या सभेतूने 25 मे 2024 पासून हे सेवा मंडळ तालुक्यात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव यांचे तर्फे सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्वर्गीय चिंधुजी पुरके आदिवासी आश्रम शाळा तालुका मारेगाव येथे होणाऱ्या शिबिरामध्ये  बौद्धिक व आध्यात्मिक, सुसंस्कार,ध्यान,प्रार्थना, सफाई रामधुन,थोरांचे चरित्र,व्यक्तिमत्व विकास,परिसर रक्षण, ग्रामगीता, आयुर्वेदिक चिकित्सा इत्यादी. व्यायामाच्या बाबतीत लेझीम, योगासने, प्राणायाम,सूर्यनमस्कार, लाटी-काठी व मल्लखांब तसेच भजन संगीत ज्यात भजन, गाणे, टाळ, खंजेरी,तबला,हार्मोनियम इत्यादी  वाद्य शिकवण्यात येणार आहे.

२५ तारखेला उद्घाटन होणारा या शिबिराचे अध्यक्षस्थानी शेर अली बापू लालानी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा यवतमाळ चे कार्यकारणी सदस्य तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वरराव मुंडे दादा केंद्रीय प्रतिभा निर्वाचन अधिकारी विजयाताई दहेकर केंद्रीय कार्यकारणी स्वीकृत सदस्य ग्रामगीताचार्य दिलीपराव डाखरे केंद्रीय कार्यकारी सदस्य व ग्रामगीताचार्य मारुतराव ठेवणे जिल्हा प्रचार प्रचारक प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून संजय खाडे,  अरविंद ठाकरे ,गौरीशंकर खुराणा, अशोक भेंडाळे, अनिल नावडे, डॉ. मनिष मस्की, सुनील देऊळकर, सुबोध कासार, पंडित घोटेकर हे राहणार आहे. या सुसंस्कार शिबिराचा बालकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन तालुका भजन प्रमुख किसन मत्ते, गुरुदेव सेवा मंडळाचे राजू सिडाम यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर