ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र:ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी, ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीकडून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपकडून चार उमेदवार देण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचे नाव जाहीर झाले आहे. सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती समोर येत असून आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर पक्षाची बाजू ठामपणे मांडली ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही ज्योती वाघमारे यांनी सातत्याने पार पाडली आहे.आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेसमधून शिवसेना शिंदे सेनेत दाखल ज्योती वाघमारे या फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीतून पुढे आलेल्या असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केले आहे. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षातही कार्यरत होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसच्या महिला अध्यक्षाची जबाबतदाीर होती. प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभांचे सुत्रसंचलन, संयोजन देखील त्या करीत होत्या‌. नंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ज्योती वाघमारेंनाच संधी का? दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मजबूत वैचारिक आणि राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चाना अंतिम स्वरूप मिळणार असले तरी शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिचय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी शैक्षणिक पार्श्वभूमी ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केलेली आहे. दहावीच्या परिक्षेत त्या ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आलेल्या आहेत. अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम. महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. ज्योती वाघमारे यांना १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव आहे. पाच भाषांवर प्रभुत्व ज्योती वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. शिवसेनेचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर