ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मोटारसायकल चोरी प्रकरणात २ सराईत आरोपी जेरबंद

४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सागर मुडे | पांढरकवडा प्रतिनिधी

पांढरकवडा शहर व परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनने प्रभावी आणि धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत एकूण ४ मालमत्ता गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

रेकॉर्डवरील आरोपीकडून ३ गुन्हे उघड
पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्र. २९३/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत नोंद असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी राजू लक्ष्मण मंचलवार (वय ३४, रा. इंदिरा नगर, पांढरकवडा) यास ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील कसून चौकशीत त्याने आणखी दोन मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. पेट्रोल संपल्याने त्या अज्ञात ठिकाणी सोडून दिल्याची माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या.

या कारवाईत एकट्या आरोपीकडून ३ गुन्हे उघडकीस आले.
दुसरा आरोपी जेरबंद; चोरीची दुचाकी जप्त
यानंतर अपराध क्र. २७५/२०२६ अंतर्गत सुरू असलेल्या तपासात पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे विवेक अशोक चौधरी (वय ३४, रा. गणेशपूर वाई, ह.मु. आखाडा वार्ड, पांढरकवडा) यास अटक केली.

त्याच्या ताब्यातून MH29 BG 5927 क्रमांकाची अंदाजे ५९ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे संबंधित गुन्ह्याचाही उलगडा झाला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
ही संपूर्ण कारवाई कुमार चिंता (पोलीस अधीक्षक, यवतमाळ), अशोक थोरात (अप्पर पोलीस अधीक्षक) व रॉबिन बन्सल (सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक लहूजी डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोउपनि नितीन सुशीर, प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, सचिन काकडे, संदीप मडावी, सुनील राठोड व राजू मुत्यालवार यांनी विशेष परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली.

शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांचा लगाम
पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक नजर ठेवली जात असल्याचा ठोस संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर