ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पांढरदेवी मंदिरात भक्ती अन् निसर्ग संवर्धनाचा जागर

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महाशिवरात्रीनिमित्त ‘बेल’वृक्षारोपण व रोपवाटप

पांढरकवडा (प्रतिनिधी): सागर मुडे

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पांढरदेवी मंदिर परिसरात केवळ पूजा-अर्चनाच नव्हे, तर निसर्ग जपण्याचाही संदेश देण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग, यवतमाळ (वनपरिक्षेत्र वणी) आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शास्त्रोक्त पद्धतीने ‘बेल’वृक्षारोपण करून भाविकांना बेलवृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. श्रद्धेला पर्यावरणाची जोड देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भगवान शंकरांना बेल अत्यंत प्रिय असल्याने याच भावनेतून मंदिराचा परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) प्रणिता पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रिना पाटील, वनपाल माधुरी पडोळे व वनरक्षक उषा बोंडे यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून उपस्थितांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. “केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जिवंत मुलाप्रमाणे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन यावेळी वन विभागातर्फे करण्यात आले.


भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना बेलवृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीला बेलाच्या पानांचे विशेष महत्त्व असते, त्यामुळे प्रत्यक्ष रोप हाती मिळाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त करत ही झाडे घराच्या अंगणात जगवण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमाला पांढरदेवी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य तसेच मंदिराचे पुजारी उपस्थित होते. राष्ट्रीय हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक वनीकरण विभागाने राबविलेल्या या ‘ग्रीन’ उपक्रमामुळे भक्ती आणि निसर्ग रक्षणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर