ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भावाचे अपत्य नसल्याच्या संशयातून अवघ्या 13 महिन्यांच्या पुतणीची काकाकडून खांडोळी:तुळजापुरातील घटना, मृतदेहाचे 7 तुकडे केले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून माथेफिरू दिराने सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीला (पुतणी) शेतात नेऊन तिचा गळा आवळून खून केला. नंतर कोयत्याने तिच्या शरीराचे ७ तुकडे करून ते पोत्यात भरून शेताजवळील नाल्यात पुरल्याची धक्कादायक घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. या क्रौर्याने तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी (जि. धाराशिव) गाव हादरून गेले. शंकरेश्वर माने असे या क्रूरकर्माचे नाव आहे. गवळेवाडी येथील २२ वर्षीय विवाहिता २२ फेब्रुवारीला प्रियकरासोबत पळून गेली होती. या प्रकरणी महिलेच्या पतीने तामलवाडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत होते. याच दरम्यान २७ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास या महिलेची १३ महिन्यांची मुलगी घरातून गायब झाली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पळून गेलेल्या विवाहिता व तिच्या प्रियकराचा शोध घेतला. ती तुळजापूर तालुक्यातील बावी येथे २७ रोजीच सापडली. पोलिसांनी चौकशी केली असता तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध चिमुकलीस पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. काका शंकरेश्वरवर संशय पोलिसांना मुलीचा काका शंकरेश्वर याच्यावर संशय आला. त्यास ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने १३ महिन्यांच्या पुतणीचा खून केल्याची कबुली दिली. भावाची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग अनावर झाल्याने १३ महिन्यांच्या पुतणीला २७ फेब्रुवारी रोजी पहाटे उचलून शेतात नेले. तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर कोयत्याने ७ तुकडे केले. हे तुकडे पोत्यात घालून एका छोट्या नाल्यात पुरून ठेवल्याची कबुली त्याने दिली. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. एकाने खून करताना बघितले १३ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर तिला प्रियकरासोबत पळालेली आईच चुपचाप घेऊन गेली असावी असा पोलिसांचा समज होता. याच गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी आरोपीने २७ फेब्रुवारीला पहाटे तिचा खून केला. मात्र, चिमुकलीचा खून करताना गावातीलच एका व्यक्तीने बघितले होते. त्याने पोलिसांना माहिती देताच या घटनेचा उलगडा झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर