ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

महिला सक्षमीकरणाला नवा आयाम — पाटण झरी येथे भव्य ‘महिला इफ्तार पार्टी’

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार फंडातून कब्रस्तानासाठी १५ लाखांची घोषणा

तालुका प्रतिनिधी झरी जामणी

झरी जामणी: तालुक्यातील पाटण पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील झरी येथे दिनांक 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महिला इफ्तार पार्टीने सामाजिक ऐक्य, महिला सक्षमीकरण आणि सर्वधर्म समभावाचा प्रेरणादायी संदेश दिला.

सामाजिक कार्यकर्त्या किरणताई देरकर यांच्या पुढाकारातून पार पडलेला हा उपक्रम स्थानिक पातळीवर लोकाभिमुख ठरत असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आदर्श उपक्रम ठरला आहे.या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील एकोपा आणि परस्पर सहकार्याची गरज अधोरेखित केली.

तसेच पाटण येथील कब्रस्तानाच्या विकासासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.कार्यक्रमाला किरणताई देरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न असून महिला सक्षमीकरण, सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारे असे उपक्रम पुढेही सुरू ठेवले जातील.

या कार्यक्रमास सतीश आदेवार, राजीव कासावार, संतोष कुचनकार, मंगेश मोहितकर, हरिदास गुर्जरलवार, बाबूजी शेख, डॉ. बाबनजी, विनोदज उपरवार, शेख हसन, हमजदजी शेख, सिताराम पिंगे, नेताजी पारखी, ममताताई पारखी, छाबुताई आसुटकर, अमिना पठाण, सुरेखा ढेंगळे, राहुल दांडेकर यांच्यासह पाटण येथील मस्जिद कमेटी तसेच दिग्रस येथील कमेटी सदस्य अशोक बरपटवार, संदीप विंचू, बापुराव लक्षेट्टीवार, राजरेड्डी  म्याकलवार, विजय पानघंटीवार, सरफराज बाडलवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या इफ्तार पार्टीला मुस्लिम महिला-पुरुषांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सामाजिक सलोखा, बंधुता आणि महिला सहभाग यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
एकंदरित, किरणताई देरकर यांच्या पुढाकारातून आयोजित महिला इफ्तार पार्टीने पाटण परिसरात सामाजिक एकात्मता आणि महिला सक्षमीकरणाचा सकारात्मक संदेश देत आदर्श उपक्रमाची नोंद निर्माण केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर