ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

किंग एडवर्ड काही अतिरेकी नव्हते:के.ई.एम.च्या नामांतरावरून विधान परिषदेत खडाजंगी; ट्रम्प टॉवरवरून सचिन अहिरांचा लोढांना टोला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील आणि देशातील सर्वसामान्यांचे हक्काचे रुग्णालय असलेल्या परळ येथील के.ई.एम. रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेकडे पाठवलेल्या या प्रस्तावावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि सचिन अहिर यांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, “मुंबईत जेव्हा प्लेगची भीषण साथ आली होती, तेव्हा किंग एडवर्ड यांनी दिलेल्या निधीतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. मग किंग एडवर्ड या व्यक्तीवर सरकारचा इतका राग का आहे? ते काही अतिरेकी नव्हते की ज्यांच्या नावाचे रुग्णालय तातडीने बदलले पाहिजे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे नाव बदलून ‘कौशल्य एकलव्य मेमोरियल रुग्णालय’ असा प्रस्ताव दिला आहे. मग किंग एडवर्ड यांच्या नावाचा आणि त्यांच्या दातृत्वाचा मान सरकार कसा राखणार? हे नामांतर करण्याचा हा आटापिटा नेमका कशासाठी सुरू आहे?” असा सवाल मिलिंद नार्वेकर यांनी सरकारला केला. लोढांना हौस असेल तर ‘ट्रम्प टॉवर’चे नाव बदलावे – सचिन अणिरांचा टोला या चर्चेत सहभाग घेत ठाकरे गटाचे दुसरे आमदार सचिन अहिर यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीवरून थेट निशाणा साधला. “पालकमंत्र्यांना जर नामांतराची इतकीच हौस असेल, तर त्यांनी त्यांच्या ‘ट्रम्प टॉवर’चे नाव बदलायला हवे होते, आम्ही त्याचे स्वागतच केले असते,” असा खोचक टोला अहिर यांनी लगावला. पुढे बोलताना अहिर म्हणाले की, सध्या के.ई.एम. रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. प्रशासनाने नाव बदलण्याऐवजी तिथल्या आरोग्य सुविधा सुधारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ‘मार्ड’ सारख्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेही या नामांतराला तीव्र विरोध केला असल्याने सरकारने हा प्रस्ताव थेट फेटाळून लावावा, अशी मागणी त्यांनी केली. “एक फोन केला असता तरी…” – उदय सामंतांचा उपरोधिक टोला आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुरुवातीला उपरोधिक टोला लगावला. “नार्वेकरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही उत्तम सलोखा आहे. त्यांनी सभागृहात हा प्रश्न विचारण्याऐवजी थेट फोनवर संवाद साधला असता किंवा कालसारखे एखादे सुंदर ट्वीट केले असते, तरी हा प्रश्न सुटला असता,” असे सामंत म्हणाले. कायदेशीर आणि ऐतिहासिक तपासणीनंतरच निर्णय, सरकारची भूमिका अंतिम उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, किंग एडवर्ड यांच्या देणगीतूनच हे रुग्णालय उभे राहिले हे सत्य असून लोढा यांनी प्रस्ताव पाठवला होता हेही खरे आहे. मात्र, सरकार यावर कोणताही घाईगडबडीत निर्णय घेणार नाही. या प्रस्तावातील सर्व मुद्द्यांची कायदेशीर आणि ऐतिहासिक तपासणी केली जाईल. नाव बदलल्यास रुग्णालयाच्या अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेवर काय परिणाम होईल, याचाही अभ्यास करावा लागणार आहे. के.ई.एम. च्या नामांतराच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही बाजूंची निवेदने सरकारकडे आली आहेत. त्यामुळे कोणतीही सामाजिक किंवा कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही, याची खात्री करूनच पुढील पाऊल उचलले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. नावापेक्षा सेवा महत्त्वाची – प्रवीण दरेकर या गदारोळात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रुग्णांच्या नातेवाइकांच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. “सध्या रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर झोपत आहेत. परळ परिसरात ४ ते ५ मोठी रुग्णालये आहेत, त्यामुळे तिथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची योग्य सोय सरकारने करावी. सध्याच्या परिस्थितीत नावापेक्षा रुग्णांना मिळणारी सेवा आणि सुविधा जास्त महत्त्वाच्या आहेत,” अशी महत्त्वपूर्ण भूमिका दरेकर यांनी मांडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर