ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तालुका काँग्रेस सरसावली:शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारामार्फत दिले निवेदन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीबाबत २२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांमार्फत शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी एल निनोमुळे महत्त्वाचा असलेला मृग नक्षत्रातील पावसाला विलंब होत असल्याने दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायम शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी अग्रेसर असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. तालुका काँग्रेसच्या निवेदनात शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या मांडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे सर्व थकीत कर्ज विना अटी सरसकट माफ करावे. मागील वर्षीचा सोयाबीन, कापूस यांचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा. दुष्काळासारख्या परिस्थितीत प्रभावित शेतकऱ्यांचे रेशनकार्ड तत्काळ सुरू करून त्यांना धान्य प्रदान करावे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पांढऱ्या (पांदण) रस्ते, विहीर आणि इतर सार्वजनिक कामे तत्काळ सुरू करावी. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा. शासनाच्या डीबीटी अंतर्गत अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना त्वरीत उपलब्ध करून द्यावेत. घरकुल योजनेचे थकीत हप्ते माफ/अदा करावेत. विद्युत मंडळाकडून ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई केली जाऊ नये आदी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाच्या आधारे त्वरीत भेट घेत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन बनकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमेय घोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश गुल्हाने, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, नगरसेवक अक्षय राऊत, प्रकाश नागतोडे, राजकुमार पत्रे, पांडुरंगजी लांडगे, प्रकाशचंद छाजेड, सुनील मते, भानुदास बावणे, भास्कर मुडावकर, अजय गावंडे, अतुल देशमुख, दिलीप मडावी, विनोद वाटमोडे, स्नेहल दिघाडे, प्रदीप नांदुरकर, अमोल कापसे, रमेश लोखंडे, मनमोहन भोयर, विपुल बोदडे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर