ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

बँकॉकहून मुंबईत आली अन् थेट जेरबंद:11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा घेऊन आलेल्या बँक मॅनेजर-मॉडेलला अटक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 11 कोटी 82 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात बँकॉकहून मुंबईत आलेल्या 29 वर्षीय हर्षा सनी या तरुणीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हर्षा सनी ही एका नामांकित खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असून ती माजी मॉडेल देखील आहे. त्यामुळे या कारवाईची राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षा सनी गुरुवारी पहाटे बँकॉकहून मुंबई विमानतळावर पोहोचली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिच्या वैयक्तिक झडतीत काहीही आढळून आले नाही. मात्र, सामानाची तपासणी करताना एका ट्रॉली बॅगेमध्ये अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेली 12 व्हॅक्यूम-सीलबंद पाकिटे सापडली. 11.82 किलो गांजा असल्याचे स्पष्ट
या पाकिटांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 11.824 किलो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 11.82 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून हर्षा सनीला अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा संबंध असण्याची शक्यता
दरम्यान, न्यायालयात हर्षाच्या वकिलांनी ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे. बँकॉकमध्ये ओळख झालेल्या एका व्यक्तीने तिचा विश्वास संपादन करून ही बॅग भारतात आणण्यासाठी दिली होती. बॅगेत अमली पदार्थ असल्याची कोणतीही माहिती तिला नव्हती, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, तपास यंत्रणांनी हा युक्तिवाद फेटाळत या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरमधून १ कोटी २० लाखांचे विदेशी मद्य जप्त, चालक अटकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून “रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की’ या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले. मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक यांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान विभागाकडून इशारा:पुढील 10 तास 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचे सावट; महाराष्ट्रात मात्र मान्सून रेंगाळला, शेतकरी चिंतेत भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील हवामानाबाबत एक अत्यंत मोठी आणि धोक्याची चेतावणी जारी केली आहे. पुढील १० तासांमध्ये देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, ५ राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात १२ आणि १३ जून रोजी अवकाळी पावसाचे संकट असेल, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मोसमी पाऊस रेंगाळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर