ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार “इंग्रजी’ वर्ग:इंग्रजी, सेमी इंग्रजी, कॉन्व्हेन्ट सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सध्या सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धात्मक युगात पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा आता तग धरुन राहु शकत नाहीत, ही बाब लक्षात आल्याने पालिकेच्या शाळांमधुनही इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने नगर पालिकेच्या काही शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रामध्ये पालिकेच्या शाळांमधुन विद्यार्थी एबीसीडीचे धडे गिरवताना पाहायला मिळणार आहे. शहरात एकेकाळी पालिकेच्या शाळा आणि या शाळांमधुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी होती. मात्र गेल्या काही वर्षांत पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल आणि मोठ-मोठ्या शिक्षण संस्थाचालकांनी सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची झालेली गर्दी यामध्ये पालिकेच्या शाळा मागे पडल्या आहेत. या स्पर्धेमध्ये केवळ मराठी शाळांचा कित्ता गिरवत राहिल्याने पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी झाली आहे. या शाळांत मिळणाऱ्या शिक्षणाच्या पद्धतीला अपडेट करण्यासंदर्भात पालिकेने कधी विचार केला नसल्याने ही अवस्था झाली आहे. मात्र आता या परिस्थितीवर मात करीत पालिकेच्या शाळांतून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तहसील चौकातील शाळा क्रमांक २० मध्ये इंग्रजी माध्यमाची वर्ग १ ते १० ची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याची पहिली तुकडी यंदा सुरू होणार आहे. त्याप्रमाणे अंबिकानगर, गांधीनगर, इस्लामपुरा आणि आठवडी बाजारातील शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू होणार आहे. यासोबतच तहसील चौक, गोधनी मार्ग, अंबिकानगर, इस्लामपुरा आणि आठवडी बाजारातील पालिकेच्या शाळेमध्ये काँन्व्हेन्टचे वर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे आता पालिकेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांना एबीसीडीचे धडे गिरवण्यास मिळणार आहे. {पालिकेच्या शाळा १५ {वर्गखोल्या १०५ {शिक्षक ८४ {बंद शाळा ३

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर