ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावात ‘सुक्या फुलांच्या कलाकृती’वर राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हस्तकला निर्मितीतून उद्योजकतेच्या नव्या वाटा खुल्या – ७५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव (जि. यवतमाळ) येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने “सुक्या फुलांच्या कलाकृती : हस्तकला निर्मात्यांसाठी एक अद्वितीय उद्योजकता क्षेत्र” या विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक उद्योजकतेचा नवा मंत्र देणाऱ्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेच्या उद्घाटक तथा अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. माधुरी तानुरकर होत्या. प्रमुख पाहुणे व विषय तज्ञ म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अजय राजुरकर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राजुरकर यांनी सुकलेल्या फुलांचा, पानांचा, मुळांचा व विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून आकर्षक हस्तकला वस्तू कशा तयार करता येतात याचे सखोल मार्गदर्शन केले.

पारंपरिक कलेला आधुनिक कल्पकता व पर्यावरणपूरक दृष्टीकोनाची जोड दिल्यास ग्रीटिंग कार्ड, लॉकेट, फोटो फ्रेम आदी वस्तूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी हे क्षेत्र उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून विविध कलाकृती तयार केल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. तानुरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “स्पर्धेच्या या युगात पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित व्यवसायात उतरणे ही काळाची गरज आहे. भविष्यात अशा पर्यावरणपूरक उद्योगांना मोठी मागणी राहणार आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रेया राहुरे हिने तर आभार प्रदर्शन कु. सानिया शेख हिने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. घोडखांदे, प्रा. डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. कांबळे, प्रा. कुरेकर, प्रा. सातपुते, प्रा. म्हस्की, प्रा. जेणेकर, प्रा. डॉ. चिरडे, प्रा. वांढरे, प्रा. कनाके, श्री. पंढरपुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. स्नेहल भांदक्कर, प्रा. डॉ. अनिल आडसरे, प्रा. श्री. प्रदीप माकडे व श्री. आकाश कुमारे यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच बी.एस्सी. भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहकार्य केले.एकूणच, सुक्या फुलांच्या कलाकृतींमधून उद्योजकतेचे नवे दालन उघडणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर