ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : वारंवार पैशांची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच शिवीगाळ, मारहाण करत उपाशी ठेवून भयंकर त्रास दिला. या सगळ्याला कंटाळून छत्रपती संभाजीनगर येथील विवाहितेनं टोकाचा निर्णय घेतला. तबस्सुम साबेर शेख असं मृत विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाऊ तालेब मकबुल अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, तालेब अन्सारी यांच्या बहिणीचे नाव तबस्सुम असून तिचा विवाह साबेर शेख याच्यासोबत गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे झाला होता. सुरुवातीला सासरच्यांकडून चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, नंतर 15 डिसेंबर 2016 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत पती साबेर शेख, सासरे जुबेर शेख आणि सासू हरजाना शेख यांनी तबस्सुम हिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.

गोदावरी नदीपात्रात मासेमारीसाठी जाळं टाकलं, पाण्यात उतरताच विजेचा तीव्र धक्का, सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी तबस्सुम हिच्यावर वारंवार दबाव टाकण्यात आला. शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच विवाहितेला उपाशी ठेवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या या त्रासाला कंटाळून तबस्सुम हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9.10 वाजता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 798/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पती साबेर शेख, सासरे जुबेर शेख आणि सासू हरजाना शेख यांच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 85, 115(2), 3(5) तसेच हुंडाबंदी अधिनियमाच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर