ब्रेकिंग न्यूज
⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा… ✦ ⚡ नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत ✦ ⚡ महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच अर्ज करा आणि शेतकरी प्रमाणपत्र घ्या, सरकारी योजनांचा थेट लाभ ✦ ⚡ गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ ✦ ⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच…
SP News Maregaon

नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nagpur Accident News: नागपूरच्या वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात त्यांचा सहा वर्षांचा एक मुलगा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेश नाईक हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून जात असताना जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ हा अपघात घडला. पाठीमागून अत्यंत वेगाने येणाऱ्या ट्रेलर चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता नाईक आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन नाईक या तिघांचाही गंभीर दुखापतींमुळे जागीच मृत्यू झाला.
सहा वर्षांचा मुलगा गंभीर
या दुर्घटनेत सहा वर्षांचा मुलगा तन्मय नाईक हा थोडक्यात बचावला आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर त्याला तत्काळ नागपूर येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त नागपुरात राहायला आले होते. आपल्या कुटुंबासह नागपूरजवळील बुटीबोरी एमआयडीसी (MIDC) परिसरात ते वास्तव्याला होते. कामावरून परतत असतानाच या सुखी कुटुंबावर काळाने झडप घातली.

अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संधी साधून ट्रेलर चालक अपघातग्रस्त वाहन जागीच सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून फरार ट्रेलर चालकाचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर