सोलापूरमधील शिवसेना-भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर!:पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही- उदय सामंत

शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला दमबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अशा धमक्यांनी शिवसेना कधीही नामोहरम होणार नाही, असा सणसणीत टोला…

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून…

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडिओ:भाजप ‘वॉशिंग मशीन’मधून काढून क्लीन चिट देईल, कॉंग्रेसच्या संगीता तिवारींचा आरोप

अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्याव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्याकडे इतर…

जळगाव जामोद हत्याकांडाला धक्कादायक वळण:ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी बाप-लेकाला अटक, तीच मुलगी पोलिस स्टेशनमध्ये हजर

एखाद्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवेल अशी एक थरारक आणि तितकीच गोंधळात टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या मुलीचा खून झाला म्हणून पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या, ज्यांनी…

मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर…

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटले!:तब्बल 55 लाखांचा घातला गंडा; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र कल्याणमध्ये याच्या अगदी उलट असा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क दोन महिलांनी संगनमत करून एका…

वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात सासऱ्याची अनोखी शक्कल:अधिक मासात जावयाला दिली घोडी भेट! धाराशिवमधील धोंडे जेवणाची चर्चा

सध्या राज्यभरात अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या महिन्यात हिंदू परंपरेनुसार जावयाला सासरवाडीकडून अत्यंत विशेष आणि मानाची वागणूक दिली जाते. सासरची मंडळी जावयाला खास भोजनाचे…

सोलापुरात थरार!:रुग्णाला रुग्णालयात सोडताच रुग्णवाहिकेला भीषण आग, श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरातील घटना

सोलापूरमधील श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एका रुग्णवाहिकेला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा प्रकार…

राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले…

डिझेल अभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा मृत्यू:नातेवाईकांचा आरोप, आरोग्य प्रशासनाचा वेगळाच दावा

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील गरोदर महिलेस वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या वैद्यकिय महाविद्यालयात आणले मात्र येथे सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर बाळ दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला तर दुसरीकडे डिझेल…

error: Content is protected !!