जि.प.शाळा जामणी (झरी) येथे शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले…

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की..
आज दिनांक 19फेब्रुवारी 2022 रोजी जि प शाळा जामणी येथे शिव छत्रपती महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने बँक आॅफ महाराष्ट्र शाखा झरी चे सहव्यवस्थापक कमलेश माहोरे व माथार्जून केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन काटकर यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भूषविले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अतिथी म्हणून कृषि विभागाचे बुजाडे तर तहसील कार्यालय येथील अशोक पंधरे व व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्ताजी परचाके व विनोद मेश्राम तसेच निखील वनकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते


केवळ जयंती निमित्त छत्रपती शिवराय यांचे विचार ऐकून विसरणे हे कार्यक्रमाचे फलीत नसून छत्रपतींच्या विचारांचे अनुकरण करणे ह्यात जयंतीचे फलित रुजलेले आहे असे मत शाळेचे मुख्याध्यापक विनोद मडावी यांनी आपल्या प्रास्ताविक व्याख्यानात व्यक्त केले.सुमारे चारशे वर्षापूर्वी जन्मलेल्या शिवरायांची जयंती आजही मोठ्या थाटात संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.ज्या राज्यांसाठी प्रत्येक मावळाच नव्हे,तर हिंदवी स्वराज्याचा प्रत्येक नागरिक मरनाला हसत मिठी मारायला नेहमी तय्यार असायचे. एवढा महान राजा आपल्या भूमीत जन्माला आला ही आपल्या सर्व महाराष्ट्रीयां करीता अभीमानाची बाब आहे.असे मत केंद्र प्रमुख काटकर यांनी सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेतव्यक्त केले

जातीभेद व धर्मभेध ह्या गोष्टी शिवरायांना अजिबा
आवडायच्या नाहीत.विध्यार्थ्यांनी आत्तापासूनच धर्म व जातीत तेढ निर्माण करणारे विचार सोडून दिले तरच खऱ्या अर्थाने शिवरायांची जयंती साजरी केल्याचे आनंद लाभेल असे मत कमलेश माहोरे यांनी व्यक्त केले शालेय वाचणालय करीता त्यांनी या प्रसंगी 500 रूपये किंमतीची पुस्तके ,तर पालक बंडूजी लेनगुळे ह्यांनी किल्ल्याची व शिवरायांची प्रतीक्रूती शाळेला सप्रेम भेट दिली.जयंती निमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्त्रूत्व स्पर्धेत एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व अतिशय उत्तम भाषणे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद मडावी यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्कलवार मॅडम व रेखाताई जिड्डेवार ह्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमास बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवटी मिठाई चॉकलेट वितरण करण्यात आले…..

Leave a Comment

error: Content is protected !!