Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अखेर तीन दिवसांनी मिळाला रामपुर येथील युवकाचा मृतदेह.

रामपुर (बाबई पोड) येथील तलावातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील रामपुर (बाबई पोड) येथील 3 युवक नेहमी प्रमाणे गावाच्या कडेला असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते.त्यापैकी एक युवक अचानक बेपत्ता झाला होता. रामपुर (बाबई पोड) व कुंभा परिसरात एकच खळबळ उडाली होती.तलावात बुडाल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत होता.

या युवकाचा शोध घेण्यासाठी यवतमाळ जिल्हा शोध बचाव पथक हि काल दुपार पासून तलावात शोध घेत होते पण त्याचा काई शोध लागत नव्हता आज दिनांक 16 जुलै 2022 रोज शनीवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांचे प्रेत तलावातील पाण्यावर तरंगताना गावांतील काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

बापुजी भाऊराव आत्राम वय सुमारे 25 वर्ष असे मृतक युवकांचे नाव असुन सदर घटना गुरुवारी दिनांक 14 जुलै 2022 रोज दुपारी 3 वाजताच्या सुमारास रामपुर (कूंभा) येथील तलावात घडली होती.रामपुर येथील तीन युवक मच्छी पकडायला तलावा कडे गेले होते.अमोल टेकाम वय 25 वर्ष,अतुल मेश्राम वय 20 वर्ष, बापुजी भाऊराव आत्राम वय 25 वर्ष हे तिन युवक मासे पकडण्यासाठी तलावावर गेले होते त्यापैकी बापूजी हा बेपत्ता झाला होता.

बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम जोरात सुरु होते पण त्याचा थांग पत्ता लागत नव्हता. त्यामुळे काल यवताळमधील चमुला पाचारण करण्यात आले होते. दुपार पासून तालावात सर्च मोहीम सुरू झाली पण त्याचा शोध लागत नव्हता.

अखेर आज दिनांक 16 जुलै 2022 रोज शनीवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास तो तलावात तरंगत असल्याचे गावांतील काही नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ माहिती मारेगाव पोलीसांना दिली.माहिती मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले. आणि नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काडण्यात आले व उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!