गेटसमोरील उकीरड्या मुळे शेतात जाणे झाले कठीण.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
अतिक्रमण करुन शेणखताचे उरकुडे शेताचे गेट जवळ टाकले आहे आहे. या उरकुडपामुळे पाणी साचून असल्याने माझ्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने अतिक्रमीत शेणखताचे उरकुडे हटवण्यात यावे या करिता राजू विनायक कस्तुरवार यांची तहसीलदार व मुख्याधिकारी नगर पंचायत ,झरी जामणी यांचे कडे दि. १५ जुलै २०२२ रोजी केली तक्रार दाखल केली आहे .
सविस्तर वृत असे की.
जामणी येथिल रमेश सदाशिव शेंडे,,अशोक शामरावअंकतवार
नामदेव लक्ष्मण लेनगुळे , वामन केशव सोनुले . , पुंडलीक रजनलवार , लिलाबाई विठ्ठल गाऊत्रे, विनोद नानाजी होडे,गंभिर शामराव मुके यांना त्यांचे शेणखत कचराकुंडी चे उरकुडे माझ्या शेताला लागुन तसेच काही जनांचे शेताचे गेट समोरच टाकुन साठवणूक केल्याने शेणखताचे ढीगारे मोठे मोठे झाल्याने या उरकुडयाने माझे शेतात ये-जा करण्याचा रस्ता गेट बंद झाले आहे तसेच वाहते पाणी हे माझ्या शेतात घुसून माझ्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे.

वरील व्यक्तींना वारंवार सांगुन देखिल काहीच ऐकत नाही. त्या मुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. व शेतात ये-जा करण्याचा मुख्य रस्ता गेट या शेणखताचे उरकुडयाने बंद झाला आहे. तरी योग्य ती कार्यवाही करून मला माझे शेताचा रस्ता मोकळा करून मिळावा व अतिक्रमीत व सर्व उरकुडे हटविण्याची मागणी शेतकरी कस्तुरवार यांचे कडून करण्यात आली आहे.
