90 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मारेगाव शहरातील प्रभाग 13 मधील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव येथील प्रभाग क्र.13 मध्ये असलेले दारू दुकान हटविण्यासाठी मारेगाव येथील एका नगरसेवकाने लाचेची मागणी केली.त्याने केलेली ही मागणी त्या नगरसेवकावरच उलट भोवली त्यालाच लाचलुचपत (एसीबी)विभागाच्या स्वाधीन केल्याची घटना मारेगाव शहरात काल दिनांक 18 जानेवारी 2023 रोज बुधवारला घडली.
काल दुपारच्या सुमारास पडलेल्या या धाडीने शहरात खळबळ उडाली असून मारेगाव शहरातील प्रभाग क्र.13 मध्ये एका व्यक्तीचे सि एल 3/47 परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे.हे दुकान हटविण्यासाठी त्याच प्रभागातील नगरसेवक अनिल गेडाम यांनी नगरपंचायत मारेगांव येथे तक्रार दाखल केली होती.
सदर नगरसेवकाने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी या नगरसेवकाने सदर परवानाधारक देशी दारूच्या व्यवसायिकाला लाचेची मागणी केली.अशातच नगरसेवकाने मागितलेली ही रक्कम मोठी असल्याने देशी दारू दुकानदाराने संबंधित प्रकारासंदर्भात यवतमाळ येथे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्या मुळे काल दिनांक 18 जानेवारी 2023 रोज बुधवारला दुपारच्या सुमारास लाचलुचपत विभागाने सापळा रचत कान्हाळगाव रोडवर कारवाई करीत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम वय सुमारे 45 वर्ष रा.मारेगाव जि.यवतमाळ यांना 90 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.
मारेगांव शहरात घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.त्यांचेवर कलम 7 भष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत ही कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ,यांचे मार्गदर्शनात पो. निरीक्षक विनायक कारेगावकर, ज्ञानेश्वर नालट,अब्दुल वसीम, महेश वाकोडे, सचिन भोयर,सुधीर कांबळे,राहुल गेडाम यांनी केली.
