गोटमार बघायला उसळला अलोट जनसागर.
यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात.
गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असुन गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. हि यात्रा आज दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवार पासुन भव्य यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे.
बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा आहे.राज्यासह लगतच्या राज्यातही ही यात्रा प्रसिद्ध आहे.गावाला लागूनच वाहणाऱ्या छोट्याश्या उगम पावणाऱ्या नाल्याच्या बाजूला श्री गदाजी महाराज यांचे मंदिर आहे.
धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते. सकाळी कबड्डी खेळानंतर गावातून एका जीवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली गेली.
सकाळी 11 वाजता अंगावर शहारे आणणाऱ्या गोटमारिला सुरुवात झाली.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर गोटमार करत होते तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर गोटमार करीत होते. जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू होता.
जेव्हा भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात. व महाराजांच्या मंदिरातील रक्षा लावल्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे.आज पासुन सुरु झालेली हि यात्रा तिन दिवस असुन दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.
आज पासुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.
