कब्रस्थान साठी जागा उपलब्ध करून द्या.

झरीतील सर्व मुस्लिम समाज बांधवांची तहशीलदार व मुख्यधिकारी यांचे कडे मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी कब्रस्थानाकरीता झरी नगरपंचायत येथे अजुन पर्यंत जागा उपलब्द नसल्यामुळे दफन करण्यास अडचण निर्माण होत आहे.

सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे बाहेरगांवातील कब्रस्थानामध्ये दफन करण्याकरीता न्यावे लागत आहे.तरी सदर बाबीची गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला झरी येथे मुस्लीम कब्रस्थानाकरीता जागा उपलब्द करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनद्वारे येथील मुस्लिम बांधवांनी मुख्यअधिकारी न.पं.झरी,अध्यक्ष न.पं.झरी यांचेकडे केली आहे.

यावेळी आसिफ कुरेशी,सुलेमान सेठ,हुसेन कुरेशी,अखिल कुरेशी,अय्युब कटोटे,खलील कुरेशी,राजू शेख,हनीफ
कुरेशी,वसीम कुरेशी,सलीम कुरेशी,अकिब कतोटे,हकिब शेख, अमजद शेख,फाजील शेख,मक्सुद शेख,खुद्दुस शेख,जावेद कटोटी,माजीद शेख,मोसिन शेख व मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!